मूलभूत विज्ञानातील संशोधनाकडे होणारे दुर्लक्ष सगळ्या जगाला महागात पडले.
डिजिटल उद्योजक । महाराष्ट्र
अमेरिकेतील व्हायरस वर संशोधन करणाऱ्या संस्थेच्या प्रमुखाचा TV interview चालू होता, ज्या वेळी त्याना प्रश्न विचारण्यात आला कि, सहा महिने झाले करोना व्हायरस येऊन अजून का औषध किंवा लस निघाली नाही..?
त्यानी उत्तर दिले तुमच्या TV च्या इतिहासात आज आम्ही तुम्हाला दिसलोय, तुमचे लाडके राजकारणी, खेळाडू, हॉलीवूड स्टार घरात बसलेत त्यांची तुम्हाला फार काळजी आहे, त्यांच्या घरात बसण्यामुळे तुमचा धंदा कमी झालाय. आम्ही आमच्या पद्धती प्रमाणेच आमचे काम करणार, एका रात्रीत काही होणार नाही.
स्पॅनिश संशोधकाला असाच प्रश्न विचारण्यात आला तिचे उत्तर विचार कराय लावणार होते 'तुम्ही खेळाडू, मुव्ही स्टार याना एका दिवसासाठी/रात्रीसाठी करोडो मध्ये पैसे देता आणि महिन्याला काही हजार मिळवणाऱ्या संशोधकांना तुम्ही हा प्रश्न विचारताय कि करोना व्हायरस वर एका रात्रीत औषध/लस का काढत नाही..?
आपल्या देशाची अवस्था तर बोलायलाचं नको, एका नॅशनल TV चॅनेल ने 'अदनान सामी' तर दुसऱ्या चॅनेल ने 'कपिल देव' ला करोना व्हायरस चा एक्स्पर्ट म्हणून चर्चेसाठी बोलावलं होते, दिवसभर त्यांचे कौतुक सांगत होते TV वाले. अशा देशात एका रात्रीत औषध/लस तय्यार होईल..?
आम्हाला आमच्या मुलांना क्रिकेटर, TV स्टार, इंजिनिअर/डॉक्टरच बनवायचे असते, त्यांनाच या समाजात स्थान आहे. बीएससी, बीए, एमएससी, पीचडी करणे म्हणजे करिअर वाया घालवणे वाटते. हि मानसिकता फक्त समाजाची नसून याना शिकवणाऱ्या प्राध्यापकांची पणआहे. पण वास्तव हे आहे कि अंतराळ संशोधन ते करोना व्हायरसवर औषध/लस शोधणारे ९०% मूलभूत संशोधकच (बीएससी, एमएससी, पीचडी डिग्री असणारे) आहेत. आपल्या आजूबाजूला कितीतरी संशोधक अगदी शांतपणे कोणतीही प्रसिद्धी न करता वेगवेगळ्या विषयावर संशोधन करीत असतात, आपले त्यांच्याकडे कधीच लक्ष नसते. मीडिया त्याना कधीच किंमत देत नाही कारण त्यांच्यात ग्लॅमर नसतेय.
भारतामध्ये ISRO सोडून अनेक विषयात मूलभूत संशोधन करणाऱ्या संस्था/विद्यापीठे आहेत हेसुद्धा अनेकांना माहित नाही. भारतातील व्हायरस वर संशोधन करणारी एकमेव सरकारी रिसर्च संस्था पुण्यामध्ये आहे हे पुण्यातील ९९% लोकांना माहित सुद्धा नसेल. जगातील फक्त 12 देशामध्ये खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट मध्ये आपला नंबर १ ने वर/खाली झाला तर सगळ्या देशात तमाशा सुरु होतो, पण १९५ देशामध्ये संशोधनात आमचा नंबर किती आहे याचे आपल्याला काहीच नसते. ज्या रामानुजन यांचे आपण अभिमानाने नाव घेतो, त्यांच्यावर मूव्ही हॉलीवूड वाल्यानी काढला पण भारतीय बॉलीवूड ने नाही. हे भारतामध्ये संशोधन करणाऱ्या संशोधकांचे वास्तव आहे. २००५ पासून जगातील ५०% पेक्षा अधिक मूलभूत विषयात संशोधन करणाऱ्या संस्था बंद झाल्या आहेत ज्यामध्ये काही करोना व्हायरस वर औषध/लस शोधत होत्या....आणि हेच आज सगळ्या जगाला महागात पडले आहे.
कदाचित काही दिवसात करोना व्हायरस वरऔषध/लस तय्यार होईल, लोक संशोधकांना विसरून पण जातील, पण इतिहास सांगतोय आज जर आपण मूलभूत संशोधनाकडे असेच दुर्लक्ष केलेत तर भविष्यात याच्या पेक्षा ताकतवान व्हायरस / बॅक्टरीया येईल.
टीप: 'एलिस ग्रॅनॅटो' ही कोरोना व्हायरस ची लस प्रयोगासाठी टोचून घेणारी जगतातील पहिली महिला कोणी मूव्ही स्टार, ग्लॅमर असणारी खेळाडू, राजकारणी, इंजिनिअर नसून ऑक्सफर्ड विद्यापीठात Microbiolgy या मूलभूत विषयात संशोधन करणारी ३० वर्षीय सायंटिस्ट आहे.
- डॉ. नानासाहेब थोरात / वैज्ञानिक