प्राथमिक शिक्षक दाम्पत्यांतर्फे नाविन्यपूर्ण "ई-स्कूल टाईम्स" शैक्षणिक उपक्रम
http://www.eSchoolTimes.in
सांगली | ११/८/२०२०
http://www.eSchoolTimes.in
सांगली | ११/८/२०२०
उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक श्री शरद जाधव व सौ.दिपाली जाधव संचलित "ई-स्कूल टाईम्स" या डिजिटल शैक्षणिक उपक्रमाने १ लाख वाचक टप्पा अल्पावधीत पूर्ण केला. विद्यार्थी,शैक्षणिक संस्था,पालक यांना केंद्रस्थानी ठेवून ई स्कूल टाईम्स ने आजपर्यत वाटचाल केली आहे.
विविध शैक्षणिक उपक्रम,माहिती यांना जगभर पोहचविणा-या "ई-स्कूल टाईम्स" या शैक्षणीक वेब पोर्टल च्या माध्यमातून अवघ्या ६ महिण्यात १ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण झाला आहे.भावी काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रात या व्यासपीठाच्या माध्यमातून "ई-मॅगझिन"सह अनेक उपक्रम प्रस्तावित असून "गोष्टींची शाळा" हा उपक्रम लहान मुलांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे.
शासन व प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत डिजिटल माध्यमाच्या नाविन्यपूर्ण व सातत्यपूर्ण वापर हा भावी काळामध्ये खूप मोठी उंची गाठेल यात शंका नाही..सदरचे त्यांचे उपक्रम सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे मत विद्यार्थी,शिक्षक,पालक वर्गातून व्यक्त होत आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------
वेब पोर्टल्स व डिजिटल सेवांकरिता संपर्क करा.:- wa.me/919890546909