STAY WITH US

Digital Udyojak - चला "डिजीटल उद्योजक" घडवूया.

नव महाराष्ट्राचे स्वप्न उद्योजकीय समृद्धीतून साकारण्यासाठी - “डिजिटल उद्योजक” व्यासपीठाची निर्मिती | Digital Udyojak

नव महाराष्ट्राचे स्वप्न उद्योजकीय समृद्धीतून साकारण्यासाठी - “डिजिटल उद्योजक” व्यासपीठाची निर्मिती

सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा जसे आपल्याला माहीतच आहे गेल्या कित्येक दिवसापासून  लॉक डाऊन सुरू आहे.  उद्योजकांचा सर्वांसाठीच हा अतिशय अडचणीचा असा काळ आहे.परंतु कोणते संकटामध्ये एखादी संधी दडलेली असते गरज आहे ती फक्त  शोधण्याची.

लॉक डाऊन मुळे डिजिटल माध्यमांचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. येणाऱ्या काळामध्ये कोणताही व्यवसाय असो किंवा तुम्ही कोणते क्षेत्रांमध्ये कार्यरत असा डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर जर तुम्ही केला नाहीत तर स्पर्धेमध्ये टिकणे निव्वळ अशक्य असेच आहे.

भविष्यातील तीव्र स्पर्धा त्यातील संधी या सर्वांमध्ये जर टिकायचे असेल तर आपल्या व्यवसायाला डिजिटल व्यासपीठावर आणण्याशिवाय पर्याय नाही आज जवळपास महाराष्ट्रामधील एक ते सव्वा कोटी सक्रिय इंटरनेट वापरकर्ते आहेत. येणाऱ्या तीन ते चार वर्षांमध्ये हीच संख्या साडेपाच कोटींपर्यंत जाणार आहे. आता प्रश्न आहे ह्या डिजिटल व्यासपीठावर इतक्या लोकांसाठी तुम्ही कोणत्या सेवा  पुरवणार आहात  याचे नियोजन आजच करणे गरजेचे आहे.

डिजिटल उद्योजक  या व्यासपीठाच्या माध्यमातून  नवनवीन व्यवसाय,  नव नवीन आर्थिक माहिती..सर्व स्तरातील उद्योजकांची यशोगाथा या सर्व माहितीचा खजिना,तांत्रिक सहाय्य, मार्गदर्शन इत्यादी सर्व डिजिटल उद्योजक या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही मराठी उद्योजक घडावा म्हणून  दर्जेदार स्वरूपात घेऊन येत आहोत.

तर चला मग येणाऱ्या काळातील डिजिटल विश्वातील ह्या  संधीचा फायदा आपल्या व आपल्या उद्योगाला तुमच्या स्वतःला करून घेण्यासाठी आजच बीजरोपण करूया डिजिटल व्यासपीठावर आगमन करूया आपल्या उद्योग व्यवसाय सेवा यांना डिजिटल ओळख देऊया चला डिजिटल उद्योजक होऊया..!